मुंबई : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’अंतर्गत एप्रिल २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने ६५५ मुले आणि ३०३ मुलींसह ९५८ मुलांची मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन फलाटांवरून सुटका केली आहे. यामध्ये चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्या बालकांची त्यांच्या पालकांशी पुनर्भेट घडवून आणली.
काही वाद किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे अथवा उच्च चांगल्या जीवन पद्धती किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वेस्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ) जवानांच्या निदर्शनास येत असतात.
हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक २८९ मुलांची सुटका केली असून, त्यात १७५ मुले आणि ११४ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने २७० मुलांची सुटका केली. त्यात १६९ मुले आणि १०१ मुलींचा समावेश आहे.
पुणे विभागाने २०६ मुलांची सुटका केली असून, त्यात १९८ मुले आणि ८ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागाने १३२ मुलांची सुटका केली असून, त्यात ७६ मुले आणि ५६ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागाने ६१ मुलांची सुटका केली असून, त्यात ३७ मुले आणि २४ मुलींचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |