09:20pm | Dec 08, 2023 |
सातारा : कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा चिरंजीव प्रियंक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले. या प्रकाराचा निषेध सातारा जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या वतीने पोवई नाक्यावर शिवतीर्थ परिसरात करण्यात आला. यापुढे कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिला. भाजप कार्यकर्त्यानी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, स्वातंत्र्यवीरांचा अनुल्लेख करणे, स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या सहभागाबद्दल शंका उत्पन्न करणे आणि याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनात गैरसमज पसरण्याचा प्रयत्न करणे, हे एकच काम कॉंग्रेसकडे शिल्लक आहे, असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला.
याबाबत विकास गोसावी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावकरांच्या विचारांचा कॉंग्रेस पार्टी सातत्याने हनन करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहे. कर्नाटक राज्यातील कॉंग्रेसचे मंत्री आणि कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र प्रियांक खर्गे यांनी कॉंग्रेसच्या धोरणाप्रमाणे सावरकरांचा अपमान करून स्वातंत्र्यवीरांचा पर्यायाने देशाचा अपमान केला आहे.
भारतीय जनता पार्टी सातारा कडून सातार्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पोवई नाक्यावर या घटनेचा निषेध करण्यात आला, कॉंग्रेस आणि खर्गेच्या च्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच खर्गे चा फोटो पायदळी तुडवून निषेध करण्यात आला आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी असले धंदे बंद करावेत अन्यथा त्यांना सातार्यात पाय ठेवून देणार नाही, असा इशारा देण्यात आला.
यावेळी सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सचिन साळुंखे, मनीष महाडवाले, जिल्हा चिटणीस सुहास राजेशिर्के, चित्रपट आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, नगरसेविका आशाताई पंडित, माजी नगरसेवक किशोर पंडित, प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले, प्रशांत जोशी, चंदन घोडके, रवी आपटे, नजमा बागवान, रोहिणीताई शिरसागर, प्रियाताई माने, अनिताताई बोडस, निशाताई जाधव, अमोल कांबळे अमोल टंकसाळे, चैतन्य बोडस, अमित काळे, राजेश माजगावकर, पोपट महाडिक, चंद्रकांत माने, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |