सातारा : सातारा येथील श्री गजानन महाराज शेगाव भक्त मंडळ सातारा यांचे वतीने परमपूज्य सद्गुरु श्री गजानन महाराज यांचा 146 वा प्रकट दिन उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यासाठी रविवार दिनांक 25 फेब्रुवारी शुक्रवार दिनांक 1 मार्च ते रविवार दिनांक 3 मार्च 2024 अखेर सद्गुरु श्री गजानन महाराज मंदिर अर्कशाळा नगर शाहूपुरी रोड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांनी दिली.
या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक 25 फेब्रुवारी रोजी गजानन महाराज यांच्या श्री गजानन विजय ग्रंथाचे सामुदायिक पारायण सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत होणारा असून हे पारायण एक दिवसाचे असून यासाठी ग्रंथ वाचणाऱ्या भक्तांनी स्वतः आणावयाचे असून भक्तांनी मंदिरात अगोदर नावे नोंद करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 1 मार्च रोजी माघ कृष्ण पंचमीला सायंकाळी सात ते साडेसात महाआरती व नामस्मरण होणार असून त्यापूर्वी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत ब्रह्मचैतन्य गायन सेवा मंडळ सातारा यांच्या मराठी भावगीते व भक्ती गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
शनिवार दिनांक 2 मार्च रोजी माघ कृष्ण षष्ठी या गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यामध्ये सकाळी आठ ते एक या वेळेत शांतीपाठ, संकल्पपूर्वक नांदी श्राद्ध, पुण्याहवाचन, आचार्य वर्ण, आचार्य कर्म, स्थलशुद्धी, ब्रम्हादी मंडल देवता स्थापना, सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या प्रतिमेची स्थापना, श्री रामचंद्र पंचायतन देवता स्थापना, महा अभिषेक, षोडशोपचार पूजा, अग्निस्थापना, नवग्रह स्थापना होऊन पूजा, नवग्रह होम व मुख्य देवतांना हवन केले जाणार आहे. सायंकाळी साडेपाच ते सात या वेळेत माऊली भजनी मंडळ करंजे यांचा हरीपाठाचा कार्यक्रम होणार आहे.
या प्रकट दिन सोहळ्याचा मुख्य दिवस माघ वद्य सप्तमी अर्थात रविवार दिनांक 3 मार्च 2024 असा असून यामध्ये सकाळी सात ते आठ या वेळेत श्री गजानन महाराजांच्या मूर्तीवर पंचामृत महाभिषेक व आरती व नामस्मरण होणार आहे. त्यानंतर सकाळी आठ ते 11 या वेळेत शांतीपाठ, स्थापित देवतांची षोडशोपचार पूजा, पवमान याग, श्रीराम नाम हवन म्हणजे श्रीराम यज्ञ, श्री सद्गुरु गजानन महाराज सिद्ध मंत्राचे हवन होऊन मृत्युंजय होम बलिदान पूर्णाहुती अभिषेक आशीर्वाचन असा कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 ते साडे अकरा या वेळेत श्री गजानन विजय ग्रंथातील पहिल्या अध्यायाचे सामुदायिक वाचन होणार आहे. यासाठी ग्रंथ हे भक्तांनी स्वतःचे घरून आणावयाचे आहेत. सकाळी पावणे बारा ते बारा या वेळेत नामस्मरण होऊन दुपारी बारा वाजता महाआरती नामस्मरण व महाप्रसाद होणार आहे.
रात्री सात ते साडेसात या वेळेत महाआरती व नामस्मरण असे कार्यक्रम होणार असून रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुपारी बारा ते तीन या वेळेत प्रकट दिन उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे ज्या भाविक भक्तांना महाप्रसादासाठी म्हणजेच अन्नदानासाठी देणगी द्यावयाची आहे त्यांनी मंडळाचे अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |