09:43pm | Jun 08, 2024 |
सातारा : केंद्रात खासदार उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची आग्रही मागणी करीत असल्याचे भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष. सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपा वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सौ. पाटील यांनी नमूद केले आहे, संविधान बदलणे बाबतच अपप्रचार अल्पसंख्याकांमध्ये जाणीव पूर्वक निर्माण केलेले असुरक्षिततेचे वातावरण, आरक्षणावरुन निर्माण केला गेलेला संभ्रम, शेतकर्यांमधील नाराजी यांचा मोठ्या प्रमाणतील फटका लोकसभा निवडणुकीत भाजपा व महायुतीला बसला आहे. असे असून देखील मोदी लाटेत राष्ट्रवादीकडे असलेला सातारा मतदार संघ भाजपने खेचून आणला आहे. त्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे.
सातारचे राजघराणे हे शिवप्रभूचा वारसा सांगणारे असणारे समाजाच्या सर्व घटकात व स्तरात त्यांचाबद्दल आत्मीयता आहे. व आपल्या सर्व समावेशक व विकासात्मक वृत्तीने कै. दादामहाराज, कै. आऊसहेब महाराज, श्री. छ. उदयनराजे, श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ती जपली व वृंदिगत केली.
या वेळचा मतदानाचा विचार केला तर गैरसमज व अपप्रचारतून शेतकरी, दलित बांधव, अल्पसंख्य समाज व मराठा समाजामध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजी होती. मतदानाच्या आकड्यावरून ते स्पष्ट झाले आहे की या सर्व समाजाला सोबत आणण्याची त्यांच्यातील गैरसमज दूर करण्याची क्षमता सातारच्या राजघराण्यात होती व आहे. मात्र काही अनाकलनीय कारणामुळे गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ या राजघराण्याला मंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
तरी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने वरिष्ठांकडे केंद्रात मा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना व राज्यामध्ये श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले यांना मंत्रीमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्याची आग्रही मागणी करीत असल्याचे भाजपा प्रदेश सदस्या सौ. सुवर्णादेवी पाटील यांनी भाजपा वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |