01:13pm | Nov 24, 2022 |
कर्नाटक : सांगलीतील जत तालुक्यावर कर्नाटकची वक्रदृष्टी पडली असून जतमधील 40 गावांवर आम्ही दावा सांगणार आहोत, असे खळबळजनक विधान कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले आहे. या 40 गावांपाठोपाठ सोलापूर आणि अक्कलकोट हा महाराष्ट्र -कर्नाटक सीमेलगतचा भागही कर्नाटकात यावा असे विधान बोम्मई यांनी केले आहे. 40 गावांवर दावा सांगणाऱ्या विधानानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. जतमधील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. याउलट सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन लढा लढून बेळगाव, कारवार, निपाणी आम्ही मिळविणार, असे नमूद करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले होते. त्यांच्या या उत्तरावरून बोम्मई यांनी फडणवीस यांनाही टीकेचे लक्ष्य केले आहे.
बोम्मबई यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंबंधी चिथावणीखोर विधान केले आहे. त्यांचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. आमचे सरकार हे देशाची भूमी, पाणी आणि सीमांचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे, त्यामुळे सीमाभागातील जिल्ह्यांमधील एक इंचही जागा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील कर्नाटक भाषिक प्रदेश सोलापूर आणि अक्कलकोट हा कर्नाटकात सामील व्हावा. 2004 सालापासून महाराष्ट्राने सीमावादासंबंधी सर्वोच्च न्यायालयात केस दाखल केली आहे, मात्र त्यांना अद्याप यश मिळालेले नाही. आम्ही आमची कायदेशीर लढाई अधिक बळकट करत आहोत. '
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |