02:17pm | May 25, 2020 |
सातारा : विनापरवाना वाळूचे उत्खनन करून त्याची चोरटी वाहतूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सहा अवैध वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून 35 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. महेश शशिकांत हिरवे (वय 21) रा. कुरवली, ता. खटाव, गौरव आनंदराव पवार (वय 28) रा. उबंरडे, ता. खटाव, योगेश सुरेश राऊत (वय 22) रा. सातेवाडी, ता. खटाव, आकाश सुरेश गोडसे (वय 23) रा. कुरवली फाटा, ता. खटाव, श्रीकांत विठ्ठल बनसोडे (वय 22), रा. वडुज, ता. खटाव, मंगेश मधुकर मोहिते (वय 25), रा. वडुज, ता. खटाव अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेली माहिती अशी, की पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक करणार्यांना विरोधात कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करुन कारवाईच्या सूचना केल्या होत्या.
आज दि. 25 मे रोजी सर्जेराव पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वाकेश्वर, ता. खटाव गावच्या हद्दीत विठोबाचा माळ नावाच्या शिवारात, येरळा नदी शेजारील ओढ्यात छापा टाकला असता तिथे वरील सहा जण जेसीबीच्या साह्याने डंपरमध्ये वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडे वाळू उत्खनन व वाहतूक परवाना आहे का, याची विचारपूस केली असता त्यांनी नाही असे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जेसीबी, लेलँड कंपनीचा डंपर असा एकूण 35 लाख 18 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करून त्यांच्याविरोधात आपत्ती निवारण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलीस हवालदार तानाजी माने, राम गुरव, पोलीस नाईक शरद बेबले, प्रवीण फडतरे, राजू ननावरे, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, गणेश कापरे, वैभव सावंत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |