वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात महिला परिवर्तन घडवतील

पुरुषोत्तम जाधव : संवाद यात्रेच्या निमित्ताने वाई येथे हजारो महिलांशी थेट संवाद

by Team Satara Today | published on : 08 October 2024



वाई : वाई शहरात शिवसेनेच्या संवाद यात्रेचा जोरदार झंजावात पहायला मिळाला हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी सिद्ध झाल्या असून शासनाने दिलेल्या अनेक योजनेमुळे महिला आनंदी आहेत.

वाई, खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदार संघात शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामाबाबत थेट जनतेशी संवाद सुरू केला असून या संवाद यात्रेला जनतेला  प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे.

पुरुषोत्तम जाधव यांनी वाई शहरातील हजारो महिलांशी थेट संवाद साधत लाडकी बहीण योजना यासह शासनाच्या इतर योजनेबाबत ची माहिती दिली.

यावेळी वाई विधानसभा युवा सेना योगेश फाळके, वाई तालुका उप तालुकाप्रमुख गणेश सावंत, युवासेना वाई तालुकाप्रमुख गणेश पवार, वाई शहर युवा सेना किरण भगत, विभाग प्रमुख प्रदीप भिलारे, खंडाळा सचिन जाधव, तालुका उप तालुकाप्रमुख सचिन धायगुडे, खंडाळा तालुका सहकारी साखर कारखाना संचालक भानुदास जाधव, ऍड उमेश पवार, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

जनसंवाद यात्रा महाबळेश्वर, वाई, खंडाळा या तीन तालुक्यांमध्ये १० दिवस सुरू असून पुरुषोत्तम जाधव यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, महाराष्ट्रातील नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे क्रांतिकारी पाऊल उचलत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणून इतिहास घडविला आहे. कुटुंबातील प्रत्येक महिलेला याचा फायदा होत असून आता वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात देखील या निवडणुकीत महिला क्रांतिकारी बदल घडवतील व आपल्या हक्काचा भाऊ विधानसभेत नक्की पाठवतील. यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी वाई शहरात भव्य परिसंवाद यात्रा काढून नागरिकांशी व तरुणांशी देखील संवाद साधला.

 

        वाई शहरातील हजारो महिला पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी

पुरुषोत्तम जाधव यांच्या नेतृत्वाखालील जनसंवाद यात्रा वाई शहरात प्रवेश करताच वाई शहरातील महिलांनी या संवाद यात्रेचे उत्स्फूर्तपणे ओवाळून स्वागत करीत लाडक्या बहिणीनी भावाचे जोरदार स्वागत केले. वाई शहरातील तीन हजारहून अधिक महिलांनी पुरुषोत्तम जाधव यांना विधानसभेत पाठविण्याची भूमिका यावेळेस स्पष्ट केली.    घराणेशाही विरोधात मतदारसंघात गावोगावी चर्चा एकाच घरात आमदारकी, खासदारकी, जिल्हा बँक अध्यक्षपद, बाजार समिती संचालक पद, सरपंचपद यासह सर्व पदे घेणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता घरचा रस्ता दाखवायचाच... अशी चर्चा वाई -खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, पारावर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते करू लागले आहेत. मात्र विद्यमान आमदार विरोधात एकच सक्षम पर्याय असू शकतो तो म्हणजे पुरुषोत्तम जाधव यांचाच... विद्यमान आमदार यांचे विरोधात सर्वच पक्षातील कार्यकर्ते आता उघड बोलू लागले आहेत. दिवसेंदिवस पुरुषोत्तम जाधव यांना सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा देखील पाठिंबा मिळत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जीवन विद्या मिशन, मुंबई संस्थेच्या ट्रस्टीपदी चंद्रशेखर चोरगे
पुढील बातमी
खोटं बोलणार्‍या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी

संबंधित बातम्या