सातारा : क्षेत्र माहुली, ता. सातारा येथे घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 36 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महेश चंद्रकांत गवळी रा. क्षेत्र माहुली सातारा यांच्या शेडच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 35 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
क्षेत्र माहुली येथे घरफोडी; सुमारे 36 हजारांचे दागिने लंपास
by Team Satara Today | published on : 14 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा