शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

by Team Satara Today | published on : 15 October 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या वतीने श्रीमती तेजस्विनी विक्रमशील कदम यांची कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ च्या सिनेट सदस्यपदी नामनिर्देशित करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन.   शिंदे यांनी १२ ऑक्टोबर २०२६ रोजी यासंदर्भातील नियुक्तीपत्र जारी केले आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम २८(२)(झ) अंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. सदर सदस्यत्वाचा कालावधी ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत राहणार आहे. तथापि, या कालावधीत श्रीमती कदम यांचे सिनेट सदस्यत्व सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सदस्यत्वाशी संलग्न राहणार आहे.
सिनेटच्या बैठकांमधील चर्चासत्रांमध्ये श्रीमती कदम यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी नियुक्तीपत्राद्वारे व्यक्त केली आहे.
या नियुक्तीमुळे सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधित्वाला विद्यापीठाच्या महत्त्वपूर्ण निर्णयप्रक्रियेत स्थान मिळाले आहे. त्यांच्या निवडीबद्दल प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जि प उपाध्यक्ष श्री राजू भैया भोसले च्या हस्ते   सौ. तेजस्विनी कदम, सभापती शिक्षण, अर्थ व क्रीडा समिती जि प सातारा यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या निवडीबद्दल सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्ग यांच्याकडून सौ तेजस्विनी कदम यांचे अभिनंदन करण्यात आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळामुळे मुंढेंचे व्याख्यान टाऊन हॉलमध्येच घेण्याचा निर्णय कराड नगरपरिषदेचा निर्णय; अनावश्यक खर्चाला फाटा; गर्दीचे नियोजन, बाहेरही स्क्रीनची व्यवस्था
पुढील बातमी
शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची शिवाजी विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी नियुक्ती

संबंधित बातम्या