रामनगर येथे अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 November 2026


सातारा : अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी कारचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी दुपारी तीन वाजता कोल्हापूर-पुणे महामार्गावरील रामनगर येथे धोंडीराम सुबराव साबळे त्यांची पत्नी रूपाली धोंडीराम साबळे आणि मुलगी स्वराली धोंडीराम साबळे असे तिघे मोटरसायकलवरून जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कार चालकाने (क्र. एम एच 50 यू 5012) साबळे यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने रूपाली धोंडीराम साबळे यांचा मृत्यू झाला असून धोंडीराम साबळे व स्वराली हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
डिलिमिटेशनच्या आड भाजपचा राजकीय डाव; इंडिया आघाडी फोडण्याचे प्रयत्न : पृथ्वीराज चव्हाण, आमच्या अटी मान्य झाल्यास विधेयकाला पाठिंबा देण्यास आम्ही तयार
पुढील बातमी
जैतापूर येथे एकास मारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या