सातारा : पुणे-मुंबई मध्ये भरविल्या जाणाऱ्या विविध वास्तू विषयक प्रदर्शनांच्या तोडीस तोड अशा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेने आयोजित केलेल्या रचना 2026 या बांधकाम विषयक प्रदर्शनला सातारकरांनी पहिल्या दिवसापासूनच भरभरून प्रतिसाद दिला आहे. रचना 2026 या प्रदर्शनामध्ये एकूण 100 स्टॉल्स् असून यामध्ये अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी आपले नवीन प्रकल्प सादर केले आहेत. या बरोबच प्रदर्शनामध्ये बांधकामास उपयुक्त विविध मटेरियल्स् , बांधकाम क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक मशिनरी ठेवण्यात आल्या आहेत.
सातारा, पुणे जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील बिल्डर्सनी या प्रदर्शनात सहभाग घेतला असून अतिशय नाविन्यपूर्ण व आधुनिक स्टॉल्स्ची उभारणी प्रदर्शनामध्ये केली आहे. प्रदर्शन कालावधीत बुकींग करण्यासाठी अनेक बांधकाम व्यावसायिकांनी दरामध्ये सूट दिली असल्याने साताराकरांना व गुंतवणूकदारांना मोठा फायदा होत आहे. सदर प्रदर्शनात घरकुलांची नोंदणी मोठया प्रमाणावर झाली असल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. प्रदर्शनाच्या सुरक्षिततेसाठी संपुर्ण जागेमध्ये सीसीटीव्ही कमॅरे बसविण्यात आल्यामुळे आयोजकांचे स्टॉलधारकांनी विशेष कौतुक होत आहे.
प्रदर्शनाचा सांगता समारंभ आज रविवार दि. 29 नोव्हेंबर 2026 रोजी विविध कार्यक्रमांद्वारे होणार आहे. यावेळी प्रदर्शनातील उत्कृष्ठ स्टॉलला समारोप कार्यक्रमात विशेष बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी रंगारंग कार्यक़्रम होणार असून फटाक्यांच्या आतषबाजीत रचना 2026 ची सांगता होणार आहे. गेल्या चार दिवसांपासून रचना 2026 या प्रदर्शनाला अनेक लोकप्रतिनीधी, शासकीय अधिकारी, मान्यवरांनी भेट देऊन प्रदर्शन आयोजनाचे व निटनेटकेपणाचे कौतुक केले.
रचना 2026 दि. 29 नाव्हेंबर 2026 पर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत नागरिकांना विनामुल्य खुले आहे. रचना 2026 या प्रदर्शनाची सांगता रविवार 29 नोव्हेंबर 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता विशेष आयोजित कार्यक्रमानंतर होत आहे.
रचना 2026 ला सातारकरांचा भरभरून प्रतिसाद; बांधकाम व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण, रंगारंग कार्यक्रमांनी होणार सांगता
by Team Satara Today | published on : 28 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा