सातारा : सातारा तालुक्यातील शेंद्रे गावच्या हद्दीत एच.पी. पेट्रोलपंपाजवळील कृष्णा राजस्थानी ढाब्यासमोर उभ्या असलेल्या ज्युपिटर एक्स्प्रेस कॅरिअरच्या ट्रकमधून तब्बल 95 लाख 64 हजार 913 रुपये किमतीचा माल लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजस्थान व हरियाणा राज्यांतील चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नाहीद अकबर खान (वय 36, रा. मेवात, हरियाणा) यांनी फिर्याद दिली आहे. ते ज्युपिटर एक्स्प्रेस कॅरिअर प्रा. लि. या कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.40 ते 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.30 या कालावधीत शेंद्रे गावच्या हद्दीत ही घटना घडली. कंपनीच्या मालाची वाहतूक करण्यासाठी टाटा कंपनीचा 2821 मॉडेलचा ट्रक (क्र. आर.जे. 11 जी.सी. 8506) चालकाच्या ताब्यात विश्वासाने देण्यात आला होता. हा माल नियोजित ठिकाणी पोहोचविण्याची जबाबदारी चालकावर होती. मात्र, या वाहतुकीदरम्यान ट्रकमधील माल लंपास झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
यामध्ये घरगुती साहित्याचा समावेश असून 95 लाख 64 हजार 913 रुपये किमतीचा माल चोरीस गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अझरुद्दीन कन्नु, फैमुद्दिन हकमुद्दिन, शकील इलाही बक्ष आणि जाबीद मुबीन (सर्व रा. राजस्थान व हरियाणा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत
शेंद्रे येथे कृष्णा राजस्थानी ढाब्यासमोर एक्स्प्रेस कॅरिअरच्या ट्रकमधून 95.64 लाखांचा माल लंपास; चौघांविरुद्ध गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा