अल्पवयीन मुलाच्या अपहरणप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : सातारा तालुक्यातील आसगाव येथून 14 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलाला घरातून पळवून नेल्याची फिर्याद त्याच्या वडिलांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अल्पवयीन मुलगा आसगाव येथील राहत्या घरातून निघून गेला. त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून अज्ञात ठिकाणी पळवून नेल्याची फिर्याद वडिलांनी दिली आहे. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यात तामजाईनगर परिसरातील तीन फ्लॅट फोडले; 2.85 लाखांचे दागिने, रोकड लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुढील बातमी
खिंडवाडीत जुन्या वादातून तरुणाला दगडाने मारहाण; सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या