श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा सर्व यंत्रणांनी निर्विघ्नपणे पार पाडावी - ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 23 November 2026


सातारा  : सर्व यंत्रणांनी जबाबदारीने काम केल्यास यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल. नागरिकांनीही सर्व नियमांचे पालन करावे व आदर्श यात्रा पार पाडावी, असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.
म्हसवड येथील जोगेश्वरी हॉलमध्ये आज यात्रा आढावा बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. गोरे बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, प्रांताधिकारी उज्ज्वला गाडे, तहसीलदार मीना बाबर, मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्ष पूजा वीरकर, उपनगराध्यक्ष श्रीदेवी पिसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. गोरे म्हणाले, यात्रा निर्विघ्नपणे पार पडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी. यात्रस्थळाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य करावी, शौचालयांची व्यवस्था ठेवावी, हिरकणी कक्ष स्थापन करावा. येणारा एकही भाविक सुविधांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्वांना सन्मानाची वागणूक द्यावी. अन्न व औषध प्रशासनाने पाण्याचे व खाद्यपदार्थांची तपासणी करावी, एस टी विभागाने सर्व गाड्या यात्रा काळात सुस्थितीत ठेवाव्यात.  वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सूचनाही मंत्री श्री, गोरे यांनी केल्या.
यात्रा कालावधीत रथोत्सवाचा मार्ग खड्डेमुक्त राहील याची यंत्रणेने खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.  जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची सर्वच नागरिकांनी खबरदारी घ्यावी. मंदिर परिसरात तेल व पाणी सांडणार नाही. पिण्याच्या पाण्याचे चांगले नियोजन करावे,अशा सूचनाही त्यांनी दिल्या.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दुष्काळ कायमचा संपवण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे - मंत्री जयकुमार गोरे, माण, खटाव तालुक्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा घेतला आढावा

संबंधित बातम्या