भरतगाववाडी गावच्या हद्दीत तोंडाला रुमाल बांधून अंधारात संशयास्पदरीत्या फिरताना एकास पकडले

by Team Satara Today | published on : 23 November 2026


सातारा : भरतगाववाडी (ता. जि. सातारा) गावच्या हद्दीत कमानीसमोरील सर्व्हिस रोडवर तोंडाला रुमाल बांधून अंधारात संशयास्पदरीत्या आढळलेल्या एकाविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुलमजीद महम्मदउमर खान (वय ४१, रा. भरतगाव, ता. जि. सातारा) हा सूर्यास्त ते सूर्योदय या कालावधीत मालमत्तेविरुद्ध अपराध करण्याच्या उद्देशाने तोंडाला रुमाल बांधून चेहरा झाकत अंधारात स्वतःचे अस्तित्व लपवून संशयास्पद स्थितीत आढळून आला.
ही घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भरतगाववाडी कमानीसमोरील सर्व्हिस रोडवर आडोशाला घडली. याप्रकरणी पोलीस हवालदार निलेश गायकवाड यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अब्दुलमजीद खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार म्हेत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाहनात दाटीवाटीने जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल, तरडगाव येथे आमंत्रण हॉटेलसमोर पोलिसांची कारवाई
पुढील बातमी
एटीएस अधिकारी असल्याचे भासवून साताऱ्यात ज्येष्ठ नागरिकाला ५८.५० लाखांचा गंडा

संबंधित बातम्या