कोंडव्यात घर फोडून सोन्याचे ४० हजार रुपये किमतीचे नाणे लंपास; सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार

by Team Satara Today | published on : 22 November 2026


सातारा :  घरातील सदस्य परदेशात असल्याची संधी साधून चोरट्यांनी कोंडवे येथील बंद घराला लक्ष्य केले. बेडरूमच्या खिडकीचे गज कापून घरात प्रवेश केलेल्या चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे चोरून नेले. याप्रकरणी नलिनी विठ्ठल भुजबळ (रा. विठाई बंगला, पांदीचा रस्ता, कोंडवे) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भुजबळ या तीन महिन्यांसाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या मुलीकडे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापले आणि आत प्रवेश केला. घरातील ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे नाणे घेऊन चोरटे पसार झाले. परदेशातून परतल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. या घटनेमुळे बंद घरे चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्याचा क्षेत्र माहुली येथील महिलेला ८.६० लाखांचा ऑनलाइन गंडा
पुढील बातमी
चिंचणेरमध्ये डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

संबंधित बातम्या