सातारा : शाहूनगर येथील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक डेव्हिड भाऊ कांबळे (वय ८७) यांचे 87 वर्षी शाहूनगर येथे राहत्या घरी 20 नोव्हेंबर 2026 रोजी सातारा येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
डेव्हिड भाऊ कांबळे हे साहित्यिक व कवी प्रदीप कांबळे यांचे ते वडील आहेत. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांनी विविध ठिकाणी 39 वर्षे सेवा केली. त्यांना शासनाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार मिळालेला होता. त्यांच्या पश्चात श्रीमती शालन, मुले चिरंजीव प्रदीप आणि चिरंजीव प्रशांत, कन्या सुजाता तसेच सौ. सुनिता व रेश्मा या स्नुषा आहेत. त्यांना विविध मान्यवरांसह नागरिकांनी श्रद्धांजली वाहिली.
सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक डेव्हिड भाऊ कांबळे यांचे निधन; साहित्यिक व कवी प्रदीप कांबळे यांना पितृशोक
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा