सातार्‍यातील गुरुवार पेठेतून तरुण भाऊ-बहीण बेपत्ता; अपहरणाचा संशय, शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : सातार्‍यातील गुरुवार पेठ परिसरातून दोन तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. हर्षा शुभम चव्हाण (वय 23) आणि शुभम वाल्मिक चव्हाण (वय 30) हे गेल्या आठवड्यात घरातून बाहेर पडल्यानंतर परतलेले नाहीत. नातेवाइकांनी शोध घेऊनही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दोघेही अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पळवून नेले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. याबाबत ताई वाल्मिक चव्हाण यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीमध्ये दोघांचे अपहरण झाल्याची शक्यता नमूद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार भोंडवे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यातील मनाली चौकात कामावरून घरी निघालेल्या युवकाला मारहाण करून साडेचार हजार लुटले
पुढील बातमी
चारा, पिण्याचे पाणी आणि सिंचनासाठी जिल्ह्यात काटेकोर नियोजन - पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या