सातारा : कामावरून घरी निघालेल्या युवकाला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अडवून मारहाण करत त्याच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना सातार्यातील मनाली चौकात घडली. याप्रकरणी अनिकेत काटे आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करण सागर कनाके (वय 21, रा. गोडोली) हा रात्री साडेआठच्या सुमारास कामावरून घरी पायी जात होता. राधिका रस्त्यावरील कदम पेट्रोल पंपापासून दुचाकीवरील दोघे त्याचा पाठलाग करत हॉर्न वाजवत होते. त्याकडे दुर्लक्ष करून तो मनाली चौकात पोहोचला. रस्ता ओलांडण्यासाठी थांबला असता संशयितांनी त्याची बॅग हिसकावली. त्यानंतर डबा आणि लोखंडी पाइपने मारहाण करून खिशातील साडेचार हजार रुपये काढून घेतले. पुढील तपास उपनिरीक्षक अय्याज बागवान करत आहेत.
सातार्यातील मनाली चौकात कामावरून घरी निघालेल्या युवकाला मारहाण करून साडेचार हजार लुटले
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा