सातारा : दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तिघांनी दोघांना मारहाण केल्याची घटना समर्थ मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओम प्रकाश लोकरे (रा. पद्मावती मंदिराजवळ, मंगळवार पेठ) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. शुक्रवारी समर्थ मंदिर परिसरातून जात असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना कट मारला. याबाबत लोकरे यांनी काही अंतरावर त्या चालकाला थांबवून जाब विचारला. याचा राग आल्याने दुचाकीस्वाराने आपल्या दोन मित्रांना घटनास्थळी बोलावून घेतले.
त्यानंतर तिघांनी रस्त्यालगतच्या दुकानासमोरील लोखंडी स्टँड उचलून लोकरे यांना मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या कविता लोकरे यांनाही मारहाण करण्यात आली. पुढील तपास हवालदार वाघ करत आहेत.
दुचाकीचा कट मारल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दोघांना मारहाण; तिघांविरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा