पंताचा गोट परिसरातील घरातून दागिने लंपास; दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : पंताचा गोट परिसरातील घरातून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सैफिया जावेद पटेल आणि राहुल ज्ञानेश्वर पवार (दोघेही रा. सातारा) यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वहिदा अकिल शेख (रा. पंताचा गोट) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या राहत्या घरातून सोन्याचे गंठण, कर्णफुले आणि अन्य दागिने असा एकूण 34 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
घरातील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेख यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास हवालदार डी. बी. यादव करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोविड सेंटर ते शिल्पकृती... व्हाया संग्रहालय; जागतिक वारसादिनी सुहास राजेशिर्के यांच्या धडपडीला आगळीवेगळी पोहोचपावती
पुढील बातमी
शनिवार पेठेतील गोरक्षण बोळ परिसरात घरफोडी; 42 हजारांचे मंगळसूत्र चोरीला

संबंधित बातम्या