नवी मुंबईची तरुणी, साताऱ्याचा मुलगा; फोटो काढत असतानाच केला हल्ला; कुर्ल्यातील घटना, घाटकोपर पोलिसांकडे तक्रार

by Team Satara Today | published on : 21 November 2026


मुंबई: मुंबईतील कुर्ला येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे. कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ असलेल्या उद्यानात एका तरुण-तरुणीला लाथा-बुक्क्या, लाठीने बेदम मारण्यात आले. उद्यानातील या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आला आहे. कुर्ला पश्चिममध्ये असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात एक तरुण आणि तरुणी फिरायला गेले होते. त्यानंतर ही घटना घडली. आजूबाजूच्या लोकांनी मोबाईलमध्ये मारहाणीचा व्हिडीओ शेअर केले.
ज्या तरुण-तरुणीला मारहाण झाली. त्यांच्याबद्दल काही माहिती समोर आली आहे. तरुण २१ वर्षांचा असून, तरुणी १९ वर्षांची आहे. तरुण हा साताऱ्याचा आहे, तर तरुणी नवी मुंबईतील आहेत. दोघेही चांगले मित्र आहेत, असे त्यांनी पोलिसांना सांगितले.
तरुण-तरुणीला भेण्यासाठी साताऱ्यावरून मुंबईत भेटण्यासाठी आला होता. तरुण आणि तरुणी शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी कुर्ला परिसरातील फिनिक्स मॉलमध्ये फिरायला आले होते. तिथे फिरल्यानंतर ते मॉलमधून बाहेर पडले. मॉलजवळच असलेल्या प्रमोद महाजन उद्यानात ते गेले.
फोटो काढत असतानाच अल्पवयीन मुलांच्या टोळक्याचा हल्ला
दोघेही उद्यानात गेल्यानंतर फिरत होते. त्यानंतर त्यांनी फोटो काढायला सुरुवात केली. त्याचवेळी अचानक सात-आठ अल्पवयीन मुलांनी त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. काहींनी लाथा बुक्क्या मारल्या, तर काहींनी काठीने त्यांना मारहाण केली.  अल्पवयीन मुलांनी तरुणीलाही पाठीत आणि डोक्यात काठीने मारहाण केली. काही मुलांनी त्यांना दगडही मारले. मारहाण करत असतानाच दोघेही उद्यानातून बाहेर पडले. त्यानंतर तरुण-तरुणीने घाटकोपर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
घाटकोपर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १८९(४), ११८(१), ३५२ आणि ३५१(२) नुसार आलेल्या ८ विधी संघर्षग्रस्त मुलांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. ५ मुलांच्या पालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भुईंज कारखाना-भुईंज रस्त्यावर ट्रॅक्टरच्या धडकेत युवक ठार; ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पसार
पुढील बातमी
कार दुभाजकाला धडकून उलटली; चिपळूण येथील दोघे ठार; तीनजण जखमी, सातारा-पुणे महामार्गावर सुरूर येथे अपघात

संबंधित बातम्या