घोणसला जीवदान देताना कोरेगावच्या सर्पमित्राचा मृत्यू; दुर्दैवी घटनेने कोरेगाव शहर व परिसरात शोककळा

by Team Satara Today | published on : 21 November 2026


कोरेगाव : विषारी घोणस सापाला सुरक्षित ठिकाणी सोडून त्याचे प्राण वाचवताना कोरेगावचे सर्पमित्र व प्राणिमित्र योगेश धुमाळ (वय ४८) यांचा शुक्रवारी आसरे येथे सर्पदंशाने मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने कोरेगाव शहर व परिसरात शोककळा पसरली आहे.
मूळचे पुणे जिल्ह्यातील वीर, ता. पुरंदर येथील धुमाळ कोरेगाव येथे राहत होते. झाप्रा या प्राणिमित्र संघटनेशी जोडले जाऊन त्यांनी सर्पमित्र म्हणून काम केले होते. सर्पांसह भटके कुत्रे, मांजरी आणि संकटात सापडलेल्या अन्य प्राण्यांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. शुक्रवारी दुपारी आसरे येथील उसाच्या शेतात घोणस साप आढळल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. सापाला पकडून पोत्यात घालत असताना त्याने त्यांच्या करंगळीला दंश केला. दंशानंतरही त्यांनी सापाला सुरक्षित निर्जनस्थळी सोडले.
मात्र, विषाचा परिणाम जाणवू लागल्याने त्यांनी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वीही त्यांना घोणसने दंश केला होता; मात्र त्यावेळी ते उपचारांनंतर बचावले होते. त्यांच्या पश्‍चात बहीण, मेहुणे, भाचे व भाचेसून असा परिवार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाचगणीत एफडीएची धडक कारवाई; दोन हॉटेलचे परवाने ठराविक कालावधीसाठी निलंबित
पुढील बातमी
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील ९ शिक्षकांचे निलंबन; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा दणका, शिक्षकांमध्ये खळबळ

संबंधित बातम्या