सातारा : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. आयोगाच्या १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार मतदारांसाठी गणना प्रपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून, या प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चीत करण्यात आले आहे.
गणना प्रपत्र छपाई आणि वितरण: १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत, गणना प्रपत्रे तयार व मुद्रित करून, १८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत त्यांचे वितरण आणि संकलन केले जाणार आहे. संकलित केलेली गणना प्रपत्रे १० डिसेंबर २०२६ पर्यंत निकाली काढण्यात येतील. महाराष्ट्रात नोटीस टप्पा तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची प्रक्रिया १५ डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल.
बीएलओंमार्फत कार्यवाही: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदारांना गणना प्रपत्र व सूचनांचे वाटप करतील आणि भरलेल्या प्रपत्राची प्रत व्हॉट्सॲपद्वारे किंवा स्वतंत्र पोचपावतीच्या स्वरूपात मतदारांना देतील.
या सुधारित वेळापत्रकाबाबत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना अवगत करून, प्रक्रियेला प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण- २०२६ सुधारित वेळापत्रक जाहीर
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा