सातारा : सुमारे दोन लाखांच्या गंठणाची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 ते 19 दरम्यान कोडोली येथील एका महिलेचे पर्समध्ये ठेवलेले तीन तोळे वजनाचे व एक लाख 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार पाटोळे करीत आहेत.
एका महिलेचे पर्समध्ये ठेवलेल्या दोन लाखांच्या गंठणाची चोरी; अज्ञाता विरोधात गुन्हा
by Team Satara Today | published on : 21 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा