सातारा : सातार्यातील गोडोली नाका ते पोवई नाका रस्त्यावर पायी निघालेल्या पादचार्याला अनोळखी वाहनाची धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. बबन विठ्ठल मस्के (वय ६४, रा. गोडोली, सातारा) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ही घटना दि. १८ नोव्हेबर रोजी घडली आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाता विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
गोडोली नाका ते पोवई नाका रस्त्यावर वाहनाची धडक बसल्याने वृध्दाचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 18 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा