पाल येथे १ कोटी ६८ लाख रुपयांच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्घाटन; आमदार मनोज घोरपडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती, टायगर बायो फिल्टर तंत्रज्ञानाचा वापर

by Team Satara Today | published on : 18 November 2026


सातारा  : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत मौजे पाल, ता. कराड येथे १ कोटी ६८ लाख रुपये खर्चाच्या मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ आज  संपन्न झाला. ग्रामीण भागातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करणे,  मैला गाळाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन करणे, तसेच नागरिकांना स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे, हा या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत पाल गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
सदर प्रकल्पात प्रामुख्याने कराड तालुक्यातील ५१ गावांचा समावेश असून, सेप्टीक टाक्यांमधील मैला संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी शासनामार्फत मैला वाहतुकीसाठी विशेष गाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सदर प्रकल्पामध्ये जमा केलेल्या मैल्यावर टायगर बायो फिल्टर या आधुनिक प्रणालीद्वारे पाणी शुद्धीकरण आणि खतनिर्मिती केली जाणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करता येणार असून, तयार होणारे खत विक्री करून ग्रामपंचायत पाल यांना देखील आर्थिक फायदा होणार आहे.
या उद्घाटन समारंभास आमदार मनोज घोरपडे, जिल्हा परिषद सदस्य मदनभाऊ काळभोर, जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे, सुरेशतात्या पाटील, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गौरव चक्के, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, उपअभियंता जयदीप पाटील जिल्हा तज्ञ रवींद्र सोनवणे, राजेश भोसले,अजय राऊत  दादासो यादव,  रणजीत पाटील,  शंकरकाका शेजवळ, शिरगावचे सरपंच संतोष यादव पाटील, नागठाणेचे उपसरपंच अनिल साळुंखे, उपअभियंता,बांधकाम विभाग,माधव पाटील, सतीश शिंदे, पापा गोरे, संतोष पाटील,  ऋषिकेश गोरे, सरपंच धनंजय घाडगे, उप सरपंच सुनीलनाना काळभोर, सुरेश पाटील, ग्रामपंचायत अधिकारी डी आर केंगार यांच्यासह ग्रामस्थ,  मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नका; शिवेंद्रसिंहराजेंचा स्वपक्षीय जयकुमार गोरेंना सूचक इशारा
पुढील बातमी
निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करावेत - जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती आरती नांगरे

संबंधित बातम्या