सातारा : मारहाण प्रकरणी 13 जणांना विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पाडळी, ता. सातारा येथे झालेल्या गर्दी मारामारी प्रकरणी विवेक समाधान तुपे, अजित समाधान तुपे, सागर कमलाकर खवळे, समाधान नामदेव तुपे आणि एक महिला यांच्या विरोधात एका महिलेने बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.
दरम्यान, दुसऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तीन महिलांसह विकास बबन जाधव, विजय सोनावणे, सागर युवराज जाधव, अक्षय युवराज जाधव, निरंज विकास जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार पी. पी. शिंदे करीत आहेत.
पाडळी येथील मारहाण प्रकरणी 13 जणांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा