सातारा : म्हसवे येथील घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी रात्री दहा ते साडेअकराच्या दरम्यान आकाश ज्ञान छेत्री (रा. मातोश्री पार्क, म्हसवे, ता. सातारा) यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे सहा लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबतची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.
म्हसवे येथील घरफोडीत सुमारे सहा लाखांचे दागिने लंपास; सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद
by Team Satara Today | published on : 16 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा