पांगारीच्या १० वर्षीय श्रेयनने जिंकले कळसूबाईचे शिखर; लहान वयात मिळवलेल्या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव

by Team Satara Today | published on : 15 November 2026


पाचगणी : पांगारी (ता. महाबळेश्वर) येथील अवघ्या दहा वर्षांच्या श्रेयन किशोर पांगारे या गिर्यारोहकाने कळसूबाई शिखरावर यशस्वीपणे तिरंगा फडकवला आहे. पांगारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या श्रेयनने आपल्या कुटुंबातील तीन पिढ्यांच्या ट्रेकिंगच्या परंपरेला पुढे नेत मिळवलेले हे यश संपूर्ण पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद ठरले आहे.
कळसूबाई शिखराची चढाई ही प्रौढांसाठीही कसोटी पाहणारी असते. मात्र, अत्यंत लहान वयात श्रेयनने कोणतीही न अडखळता हा खडतर मार्ग गाठला. वाटेत येणारी कठीण लोखंडी शिडी, तीव्र स्वरूपाची चढाई आणि दमछाक करणाऱ्या वाऱ्यांशी मुकाबला करत श्रेयनने कोणत्याही न थकता आपले पाऊल पुढे ठेवले.
वडील आणि नातेवाइकांच्या मार्गदर्शनाखाली अखेर त्याने कळसूबाईचे सर्वोच्च शिखर गाठले. त्याने लहान वयात मिळवलेल्या या यशामुळे पांगारीसह तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडमध्ये बँक मॅनेजरने संपविले जीवन; दोन महिला क्षेत्रीय व उपक्षेत्रीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुढील बातमी
साताऱ्यात ऊसदराच्या पत्राची होळी; ३८०० दराविरोधात संघटना आक्रमक; शहापुर, शिवथर, नवारस्त्यावर आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी पुन्हा बैठक

संबंधित बातम्या