कराडमध्ये गजबजलेल्या भेदा चौकात आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनला आग, सुदैवाने कोणीही जखमी नाही

by Team Satara Today | published on : 15 November 2026


कराड : कराड तालुका पोलिस ठाण्यातंर्गत विविध गुन्ह्यातील संशयितांना घेऊन निघालेल्या पोलिस व्हॅनने गजबजलेल्या भेदा चौकात अचानक पेट घेतला. आगडोंब उसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अग्निशमनसह पोलिस, नागरिकांच्या तत्परतेने आग आटोक्यात आली. आगीत व्हॅनचे मोठे नुकसान झाले मात्र, सुदैवाने वाहनातील कोणीही जखमी झाले नाही. पाच संशयितांसह सहा पोलिस वाहनात होते. आगीची चाहूल लागताच सर्वांनी सुरक्षित स्थळी पळ काढल्याने हानी टळली. शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगल्या गुन्ह्यात पाच संशयितांना सातारा येथे नेण्यात येत होते. पोलिस व्हॅन शहर पोलिस ठाण्याची आहे. त्यात पाच पोलिस व चालक अशा सहा कर्मचाऱ्यांचा समावेश होता. व्हॅन भेदा चौकात येताच शाॅर्टसर्किट झाले. त्यात व्हॅनने पेट घेतला. त्यामुळे गदारोळ उडाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटण विधानसभा मतदारसंघातील नवीन ग्रामपंचायत, रस्ते व स्मशानभूमीची कामे लागणार मार्गी; ६ कोटी ३४ रुपयांचा निधी मंजूर
पुढील बातमी
ऊसदर जाहीर न करताच गाळप हंगाम सुरू केल्याने शेतकरी संघटना आक्रमक; वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ऊस वाहतूक रोखली

संबंधित बातम्या