सातारा : एकाची सुमारे 95 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनोळखी मोबाईलधारकांनी एपीके लिंक पाठवून तब्बल 95 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी अनोळखी मोबाईल क्रमांक वापरकर्त्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 13 जुलै 2026 रोजी घडली आहे. याप्रकरणी अमित रमेश साळुंखे (वय 35, रा.देगाव ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नीलेश तांबे करीत आहेत.
एपीके लिंक पाठवून 95 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 15 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा