सातारा : कोयना जलाशय परिसरातील गावांमध्ये दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त ५०० शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिधा किटचे वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या शिधा किटचे वितरण करण्यात आले.
कोयना जलाशय परिसरातील पश्चिम भागातील गावांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत बळीराजाला आधार देत त्यांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
शिवसेना शहरप्रमुख निलेश मोरे यांनी या उपक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांतून तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने हा मदत उपक्रम यशस्वीपणे पार पडला. संकटाच्या काळात शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी निलेश मोरे (शिवसेना शहरप्रमुख,सातारा), अजित सपकाळ (जिल्हा परिषद सदस्य), सचिन कदम, पवित चोरगे, विजय शिंदे, किरण शिंदे, महेश शिंदे, समर्थ शेलार, शकील शेख यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचे आणि जनसेवेच्या भावनेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; संजय मोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी : ना. शिंदे यांच्या हस्ते शिधा किटचे वितरण
by Team Satara Today | published on : 14 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा