आरळे गावच्या हद्दीत हॉटेल व्यवसायिकास मारहाण; दोन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 November 2026


सातारा : हॉटेल व्यवसायिकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 ऑक्टोबर रोजी आरळे, ता. सातारा गावच्या हद्दीत स्वप्निल दीपक साबळे (रा. आरफळ, ता. सातारा) या हॉटेल व्यवसायिकाला लोखंडी विळ्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी मंगेश जगन्नाथ कदम, विकास जगन्नाथ कदम दोघेही (रा. आरळे, ता. सातारा) यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पुनर्वसन चिंचणीतील एकास मारहाण; चौघांवर गुन्हा
पुढील बातमी
क्षेत्र माहुली येथे घरफोडी; सुमारे 36 हजारांचे दागिने लंपास

संबंधित बातम्या