सातारा : उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून एकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 12 रोजी आकाश दिलीप साळुंखे (रा. चिंचणी (पुनर्वसन), पोस्ट कामेरी, ता. सातारा) यांना उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून सुमित किरण जावळे (रा. करंजे सातारा), जय मिलिंद गायकवाड (रा. दौलत नगर सातारा), प्रथमेश पवार व नाना शिंदे (पूर्ण नाव व पत्ते माहीत नाहीत) यांनी लोखंडी हत्याराने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून पुनर्वसन चिंचणीतील एकास मारहाण; चौघांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 14 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा