सातारा : सातारा शहरातून अज्ञात चोरट्याने दोन दुचाकींची चोरी केल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 ते 12 दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने उल्केश उदय आमने (रा. सदर बझार, सातारा) यांची घरासमोर पार्क केलेली दुचाकी (क्र. एमएच 11 सीएक्स 0012) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, विकास बबन काटे (रा. गणेश चौक, कोडोली, सातारा) यांची बुलेट मोटरसायकल (क्र. एमएच 11 सीव्ही 9493) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
सातारा शहरात सदर बझार व कोडोलीतून दोन दुचाकींची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 14 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा