जागेचे व्यवहारावरून एकास मारहाणीसह दमदाटी प्रकरणी चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 13 November 2026


सातारा : मारहाणीसह दमदाटी केल्याप्रकरणी चार जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून 2026 ते 9 नोव्हेंबर दरम्यान जागेचे व्यवहारावरून ऋषिकेश काकासाहेब बनसोडे (रा. दौलत नगर, सातारा) यांना मारहाण करून तसेच त्यांना व त्यांच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाबासाहेब बनसोडे (रा. करंजे पेठ सातारा), आशिष कांबळे, राजेश कांबळे (दोघेही रा. सातारा) आणि ऋषिकेश भोसले (रा. रेवडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार इष्टे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
त्या युवतीच्या आत्महत्याप्रकरणी तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुढील बातमी
एका अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी स्कूल बस चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या