सातारा : युवतीने केलेल्या आत्महत्या प्रकरणी एका तरुणा विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या युवतीने सातारा शहरात विषारी औषध पिऊन आत्महत्या केली होती. त्याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ कडव (रा. साबळेवाडी, वेण्णानगर, ता. सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.
त्या युवतीच्या आत्महत्याप्रकरणी तरुणावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 13 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा