सातारा : सैनिक स्कूल सातारा येथे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी इयत्ता सहावी आणि इयत्ता नववीच्या प्रवेश परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी वयोमर्यादेची अट निश्चित करण्यात आली असून, इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय ३१ मार्च २०२७ पर्यंत १० ते १२ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच, इयत्ता नववीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय ३१ मार्च २०२७ पर्यंत १३ ते १५ वर्षांच्या दरम्यान असावे.
इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याचे ऑनलाइन प्रवेश अर्ज ३ नोव्हेंबर २०२६ ते २ डिसेंबर २०२६ (रात्री ११:५० वाजेपर्यंत) या मुदतीत भरणे अनिवार्य आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी किंवा कोणत्याही शंका व अडचणींच्या निवारणासाठी पालकांनी https://exams.nta.nic.in/sainik-school-society/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. शेवटच्या क्षणाची गर्दी टाळण्यासाठी पालकांनी लवकरात लवकर अर्ज भरून या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सैनिक स्कूल सातारा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सैनिक स्कूल सातारा प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू; प्रवेशासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी
by Team Satara Today | published on : 12 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा