सातारा : एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सातारा शहरातील प्राथमिक शिक्षक बँक ते तहसीलदार कार्यालय रस्त्यावर जुन्या वादातून रेहान उर्फ राज फरास आणि मन्या कांबळे यांच्यावर गुप्तीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अजय उर्फ पांडा चंद्रकांत घाडगे, प्रसाद अजय घाडगे, तनिष्क उर्फ बंटी प्रमोद कांबळे (तिघेही रा. रविवार पेठ, सातारा), गणेश शंकर गुरव, यश गणेश गुरव (दोन्ही रा. मोळाचा ओढा, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.
शिक्षक बँक ते तहसीलदार कार्यालय रस्त्यावर एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 12 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा