सातारा : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांतील ५९ गावे व ३२२ वाड्यांमधील ७९ हजार ६४५ नागरिक आणि ६४ हजार ९४७ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या एकूण ५२ टँकरमध्ये १ शासकीय आणि ५१ खाजगी टँकरचा समावेश आहे. या टँकरसाठी १०९.७२ खेपा मंजूर आहेत. पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने ११ विहिरी आणि १० बोअरचे अधिग्रहण केले आहे.
माण तालुक्यातील ४५ गावे आणि २६९ वाड्यांतील ६४ हजार ४५४ लोकसंख्या आणि ५८ हजार पशुधन टँकरवरद्वारे पणी पुरवठा करण्यात येत आहे. खटाव तालुक्यातील ११ गावे आणि ५१ वाड्यांमधील १३ हजार ४१७ नागरिक व ६ हजार ६६७ पशुधनासाठी ७ खाजगी टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यातील ३ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ७७४ लोकसंख्या व २८० पशुधनासाठी १ खाजगी टँकर सुरू आहे.