मारहाणीसह विनयभंग प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 11 November 2026


सातारा : मारहाणीसह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच जणांना विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. आठ रोजी सकाळी सव्वा आठ वाजलेच्या सुमारास सातारा तालुक्यातील एका गावात पतीसह दोन मुलांना मारहाण तसेच महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तुकाराम लक्ष्मण पाटील, मिथुन तुकाराम पाटील, अक्षय सयाजी पाटील, दत्तात्रय सखाराम पाटील आणि वैभव सखाराम पाटील यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गोरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना दौलतमधील दिवाळी फराळाच्या निमित्ताने देसाईंचे राजकीय मनोगत; दूध संघापासून जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणांपर्यंत भाष्य
पुढील बातमी
साताऱ्यातील बाल निरीक्षणगृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या