सातारा : अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालका विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जावळवाडी ते देशमुख नगर रस्त्यावर विक्रम संजय राऊत(रा. टिटवेवाडी, पोस्ट कामेरी, ता. सातारा) याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल (क्र. एमएच 11 एआर 3762) भरधाव वेगात चालवून संदीप बाळकृष्ण सावंत (रा. वेणेगाव, ता. सातारा) यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात संदीप सावंत यांच्यासह त्यांचा मुलगा व पत्नी हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार गवळी करी
जावळवाडी ते देशमुख नगर रस्त्यावर अपघातात तीन जणांना जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा