सातारा : दोन भावांना मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी दुपारच्या सुमारास मोळाचा ओढा येथील परिसरात सागर बजीरंगसिंग राजपूत आणि अमरीत या दोन भावांना लोखंडी पाईप आणि सळईने मारहाण केल्याप्रकरणी यश साळुंखे (रा. मोळाचा ओढा, सातारा) आणि एक अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
मोळाचा ओढा परिसरात दोन भावांना मारहाण प्रकरणी दोन जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा