चिंचणेर निंब येथील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 08 November 2026


सातारा : ट्रान्सफॉर्मर मधील तांब्याच्या तारेची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर रोजी अकरा वाजण्याच्या पूर्वी चिंचणेर निंब, ता. सातारा येथील महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधील 25 हजार रुपये किंमतीची, 40 ते 50 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद पुरुषोत्तम नारायण जाधव रा. कोडोली, सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदवली असून पुढील तपास पोलीस हवालदार शिखरे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी येथे लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
पुढील बातमी
ज्वेलर व्यावसायिकाच्या मोटारसायकलला कारने धडक देत सहा लाखांच्या दागिन्यांची लूट; देवापूर-पळसावडे रस्त्यावरील घटना

संबंधित बातम्या