सातारा : लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी सात जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी रात्री 10 वाजता लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी येथे तेथीलच चार जणांना लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच तीन महिलांसह अक्षय दिलीप कडाळे, किरण दिलीप कडाळे, अमोल दिलीप कडाळे, दिलीप कडाळे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भोंडवे करीत आहेत.
लक्ष्मीटेकडी झोपडपट्टी येथे लाकडी दांडक्यासह कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा