सातारा : पशुवैद्यकीय दवाखान्यातून सुमारे 54 हजारांच्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 ते 7 दरम्यान डॉक्टर हनुमंत श्रीरंग मोहिते (रा. संभाजीनगर सातारा) यांच्या जिहे, ता. सातारा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून अज्ञात चोरट्याने 53 हजार 700 रुपये किंमतीचे मका व बाजरी बियाणे चोरून नेले आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.
जिहे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातून सुमारे 54 हजारांच्या साहित्याची चोरी
by Team Satara Today | published on : 08 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा