सातारा : एका अल्पवयीनास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांना विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी आंबेदरे, ता. सातारा परिसरात असणाऱ्या मोकळ्या पटांगणात एका अल्पवयीनास लोखंडी पाईपने मारहाण केल्याप्रकरणी अन्य चार अल्पवयीनांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.
आंबेदरे परिसरात अल्पवयीनास मारहाण केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 07 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा