अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी - पालकमंत्री शंभूराज देसाई; पाटण मतदार संघातील विविध विकासकामांचा घेतला आढावा

by Team Satara Today | published on : 06 November 2026


सातारा : अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच गावात  जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. तसेच पाटण मतदारसंघातील सर्व विकासकामे तातडीने आणि ठरविक वेळेत पूर्ण करावीत, या सर्व कामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध असून तो वेळेत खर्च करावा, असे  निर्देश  ही श्री देसाई यांनी दिले.
दुष्काळ निवारणाच्या कामांसाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय निधीची अजिबात कमतरता पडू दिली जाणार नाही. यासोबतच दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामीण व शहरी भागांत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे,  अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या
मरळी येथील विश्रामगृहात पालकमंत्री श्री. देसाई यांनी पाटण मतदार संघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. आढावा बैठकीला विविध विभागांचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पाटण मतदारसंघातील पर्यटनविषयक कामांना विशेष गती देऊन पर्यटनाला चालना देण्याच्या सूचना केल्या. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश झाला असल्याने, अधिकाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच गावात  जाऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना  ही त्यांनी केल्या.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाढे फाटा ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावर टेम्पोच्या धडकेत व्हेंटो कारचे नुकसान; चालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार
पुढील बातमी
देशाला परिवर्तनाची दिशा दाखवणारे समतेचे मार्गदर्शक - ज्ञानदीप डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संबंधित बातम्या