सातारा : इन्स्टाग्राम या सोशल मीडिया व्यासपीठावरून अश्लील व्हिडिओ प्रसारित केल्याचा प्रकार सायबर तपासात उघड झाला आहे. याप्रकरणी देगाव येथील सूरज संतोष रोकडे या तरुणाविरोधात सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर टिपलाइनकडून प्राप्त झालेल्या अहवालाच्या आधारे संबंधित इन्स्टाग्राम खात्याची माहिती तपासण्यात आली. एका युजरनेमशी संबंधित मोबाईल क्रमांकावरून दि. 10 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी विविध अश्लील व्हिडिओ फाइल प्रसारित केल्याचे तसेच संग्रहित केल्याचे तपासात निदर्शनास आले.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सूरज रोकडे (रा. देगाव, ता. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक निलेश तांबे पुढील तपास करीत आहेत.
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी एका युवकावर गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 06 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा